चाळीसगाव :-येथील बस स्टैंड वर आत्याला घेण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांचा सार्वजनिक शौचालयातून तीन जणांनी जबरदस्तीने दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केल्याची घटना 25 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली
.या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नचिकेत सुनील येवले वय 19 हा विद्यार्थी आपल्या आत्याला घेण्यासाठी चाळीसगाव बस स्टैंड वर आला असता तो लघुसंखेसाठी सार्वजनिक शौचालयात गेला असता तेथे असलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्याच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला
.याप्रकरणी नचिकेत येवले याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहे.