फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील मिल्लत नगरातील एका शिक्षकावर जुन्या भांडणाच्या कारणावरून पैसे मागत दोघांनी चाकूहल्ला केल्याची घटना गुरुवारी दि. १६ ला सकाळी घडली. या चाकूहल्ल्यात शिक्षक शेख अब्दुल खालिद फते मोहम्मद (वय ५५) हे जखमी झाले आहे. तर आरोपी शेख मुबशीर शेख युसूफ (३२, रा. अंधेरी), शेख आवेश शेख मेहमूद (वय ३७, रा. फैजपूर) असे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, फैजपूर येथे शेख अब्दुल यांना दोघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून पैशांची मागणी केली व न दिल्यास ठार मारू, अशी धमकी दिली. यानंतर दोघं आरोपींची संगनमत करून १६ रोजी शेख अब्दुल यांच्यावर फैजपूर येथील मिल्लत नगर भागात चाकूहल्ला केला. या हल्ल्यात त्यांना कमरेवर व दोन्ही हातांवर गंभीर इजा झाल्याने त्यांना जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि नीलेश वाघ, फौजदार मोहन लोखंडे, चेतन महाजन करीत आहेत. आरोपींना २० तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.