नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरात एका मारुती व्हॅनला गुरुवारी (दि. १६) अवैध्य गॅस भरतांना झालेल्या स्फोटात १० जण गंभीर जखमी झाले आहे. खामी मध्ये लहान मुलांचा समावेश असून, एका महिलेची चिंताजनक आहे. सीएनजीवर चालणाऱ्या अधिकृत चारचाकी वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
सीएनजीवर चालणाऱ्या अधिकृत चारचाकी वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणारवर वाढले आहे. असे असले तरी आजही घरगुती सिलिंडरमधील गॅस विशिष्ट पंपाच्या साहाय्याने वाहनाच्या टाकीत भरण्याचे प्रकार सुरु आहेत. विशेषतः हा गॅस भरून ओमनी गाड्या चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. ही घटना यातूनच घातल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील पुर्णा येथून शिर्डीला साईदर्शनासाठी आलेले कुटुंब नगरसूल रेल्वेस्थानकावर दाखल झाले. नगरसूल येथून दुसऱ्या खासगी वाहनाने ते येवल्यात आले. येवल्यातून शिर्डीसाठी त्यांनी भाडोत्री मारुती व्हॅन कार घेतली. ही कार गॅस भरण्यासाठी पक्की मशीद भागात चालकाने नेली. कारमध्ये गॅस भरत असताना, हा भीषण स्फोट झाला. यात १० जण जखमी झाले असून, त्यात चार लहान बालके आहेत, तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.