भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ शहरातील २२ वर्षीय तरुण परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यासाठी फर्दापूर येथे गेलेले असताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना फर्दापूर येथे शुक्रवारी दुपारी घडली असून, त्या तरुणाचे नाव हर्षल सतीश बाणाईत (वय २२) असे तरुणाचे नाव आहे. फर्दापूर येथील, महाविद्यालयात बीसीएच्या दुसऱ्या वर्षात हर्षल शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ पासून परीक्षा सुरू होणार असल्याने हर्षल हा लोकेश रडे या मित्रासह घरून निघाला महाविद्यालयात हॉल तिकीट घेऊन घराकडे निघाला व त्याला अचानक रस्त्यात भोवळ आल्याने हर्षल रस्त्यावर कोसळला. त्याला वाकोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिथून पहूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. नासिर खान यांनी त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. परिवारात हर्षल मोठा मुलगा असून, हुशार होता. त्याची परिस्थिती हलाखीची असून, वडील सलून दुकानदार आहेत.