अवैध वृक्षतोड प्रकरणी अटकेतून फारार तिघांवर गुन्हे दाखल…

0

 

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

यावल तालुक्यातील सातपुडा पुर्व भागातील पेझरीपाडा वनजमिनीच्या क्षेत्रातील अवैध वृक्षतोडीच्या गुन्ह्यात अटक झालेले तिन आरोपी फरार झाले होते. या संदर्भात यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी गणेश बळीराम चौधरी वय ४० वनरक्षक, बोरखेडा.खु! वनक्षेत्र तालुका यावल. यांच्या फिर्यादी नुसार, डोंगरकठोरा वन परिमंडळ वनक्षेत्र यावल या मधील ०६/२o२२ आणि ८/८/२०२२ अन्वये दाखल गुन्ह्यातील कायदेशीर रखवालीत असलेले आरोपी सुरेश किसन पावरा, प्यारसिंग झोमसिंग पावरा व बिलरसिंग झामसिंग पावरा (बारेला) सर्व रा. पेझरीपाडा ता.यावल हे तिघे आरोपी यावल पोलिस स्टेशनच्या क्षेत्रातुन माझी व आमच्या सहकार्याची नजर चुकवुन अंधाराचा फायदा घेत पळुन गेली आहे. फरार आरोपींचा शोध घेतला असता मात्र ते मिळुन न आल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये भाग ५/गुऱन४५८ / भादवी कलम २२४,  ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.