चाइल्ड पोर्न शेअर करणाऱ्या १० आंबट शौकिनांवर जळगावात गुन्हे दाखल…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

केंद्र सरकारने चाइल्ड पोर्नोग्राफीवर बंदी घातली असून, तरीही बरेच आंबट शौकीन कुठलीतरी युक्ती किंवा शक्कल लढवून पोर्न व्हिडीओ शोधून काढतात आणि आपल्या मित्रांना ते शेयर करतात. मात्र अश्याच काही आंबट शौकिनांवर आज गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, जळगाव सायबर सेलचे पो.कॉ.सचिन रमेश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि.१७ नोव्हेंबर २०२० ते ३० जानेवारी २०२१ पर्यंत वेळोवेळी १) आकाश माळी, २) vishal.bari.९८८३ ३) hena.sihkh ४) raj.chavhan.५४७३८९४५) ९१७८९२९६६२६६, ६) abhiram_nair_ ,७) Ajay Kumar, ८ ) vishal.sonawane. _. ६, ९) manik.bil. ३, १०) Shobha युजर नेम असणारे फेसबुक / इस्ट्राग्राम व व्हाट्सअॅपवरील खातेधारकांनी त्यांच्या फेसबुक / इस्टाग्राम खात्याद्वारे चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधीत व्हिडीओ प्रसारित केले आहेत. या प्रकरणी सायबर पोलिसांनी सोशल मीडियातील वेगवेगळ्या १० खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा पुढील तपास पो.नि.लीलाधर कानडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.