आठ कोटी मुलींना सर्व्हायकल कॅन्सर लस मोफत देणार

0

मुंबई ;- अचानक सर्व्हायकल कॅन्सरमुळे अभिनेत्री पूनम पांडे हिचा आज मृत्यू झाला. हा आजार शरीर संबंधांमुळे होतो. देशात या कॅन्सरमुळे वर्षाला ७५ हजार लोकांचा जीव जातोय. यावर मोदी सरकारने कालच्या अंतरिम अर्थसंकल्पात महत्वाची घोषणा केली होती.

मोठ्या प्रमाणावर महिलांना टार्गेट करणाऱ्या या व्हायरसशी लढण्यासाठी मोदी सरकारने कालच्या बजेटमध्ये ९ ते १४ वर्षांतील मुलींना मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली होती. हे मोफत लसीकरण असणार आहे. या वयोगटातील मुलींना त्यांच्या त्यांच्या शाळांमध्ये ही लस दिली जाणार आहे. या वयोगटातील मुलींची संख्या सध्या ८ कोटी आहे.

या लसीची किंमत सध्या खूप आहे. मोठ्याप्रमाणावर उत्पादन झाले तर ही किंमत आवाक्यात येणार आहे. कोरोना लसीसाठी पुढे आलेल्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

HPV म्हणजेच ‘ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस’ मुळे महिलांना हा कॅन्सर होतो. शरीर संबंधांवेळी संक्रमित पुरुषाच्या संपर्कात आल्यास या व्हायरसची लागण होते. एकापेक्षा अधिक पुरुषांशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलांमध्ये हा कॅन्सर आढळतो. पाच वर्षापेक्षा जास्त काळ सातत्यानं गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करणं, धूम्रपान या गोष्टींमुळे महिलांना सर्व्हायकल कॅन्सरचा धोका जास्त असतो. जर सर्व्हायकल कॅन्सरपासून वाचयचे असेल, तर नियमितपणे पॅप चाचण्या करणे अत्यंत आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.