कारची दुचाकीला धडक ; तीन जण गंभीर

0

जळगाव ;- भुसावळ कडून भरधाव वेगाने येणार्‍या चारचाकी वाहनाने दोन दुचाकी वाहनास जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकी मोटरसायकलवर मागे बसलेला १३ वर्षाचा मुलगा हा नदीच्या ५० फुट उंचीच्या पुलावरून नदीपात्रात जावुन कोसळला. तर, दोन मोटरसायकल चालक असे तीन जण या अपघातात गंभीर जखमी झाल्याचे वृत्तआहे. या जखमींना भुसावळ येथे एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असुन.अपघातानंतर कार चालक हा घटनास्थळावरून पळुन गेल्याचे सांगण्यात येत आहे .

भुसावळ कडून कार क्रमांक एम. एच. १९ बी. यु. ३०८५ घेऊन अज्ञात चालक येत होता. तर यावल कडून भुसावळ कडे दुचाकी दुध विक्री करीता अरविंद प्रभाकर पाटील (वय ४५ रा. बोरावल) हे मोटरसायकलने जात होते. त्यांच्या मागे अंजाळे येथुन भुसावळ कडे पिंटू शेकोकार व त्यांचा मुलगा सोहम शेकोकार (वय १३ दोघं राहणार अंजाळे तालुका यावल ) हे भुसावळ येथे दुध विक्रीस जात होते. या दोन्ही दुचाकींना मोर नदी पुलावरून भुसावळ कडून भरधाव वेगात येणारे एमएच १९ बि.यु३०८५ या क्रमांकाच्या कारने धडक दिली. या चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एका दुचाकीवर मागे बसलेला सोहम शेकोकार हा पुलावरून नदीपात्रात कोसळला व इतर दोन्ही दुचाकी चालकांसह बालक तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.