लक्झरी बस चा भीषण अपघात ~ आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

समृध्दी महामार्गावर मध्यरात्री थरार

0

समृध्दी महामार्गावर मध्यरात्री थरार

बुलडाणा
समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २८जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

नागपूरवरून खासगी प्रवाशी बस ही पण्याला जात होती. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. या दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररुप घेतले. प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता न आल्याने यात ही मोठी जिवीत हानी झाल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस कर्मचारी पी. आर. मुसदवाले यांनी दिली.

दरम्यान पहाटे पाच वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने हेही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या घटनास्थळावर पाच ते सहा रुग्णवाहिका, सिंदखेड राजा, किनगाव राजासह लगतच्या पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी पोहोचलेले आहेत. बसमधील प्रवाशांचा जळून कोळसा झाल्याने मृतकांची अेाळख पटवणे अवघड काम झाले आहेत. यासंदर्भात डीएनए टेस्टच्या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा झाली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपुर वरून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस झाली. त्यात प्राथमिक अंदाजानुसार २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे”

बुलढाणा जिल्हयातुन जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजाजवळ खाजगी लक्झरी बसने पेट घेतल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये 25 प्रवाशांचा जळूनमृत्यू झालाय तर दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले

नागपूर वरून एम एच 29B E 1819 क्रमांकांची भारत ट्रॅव्हलची लक्झरी बस प्रवासी घेऊन पुणेकडे जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गवरील सिदखेडराजा येथील चॅनल नंबर 333 जवळ लक्झरी बसला आग लागली व या आगे मध्ये लक्झरी बस मधील 25 प्रवाशांचा जागीच जळून जागीच मृत्यू झाला तर दोन प्रवासी जबरदस्त झाली असून त्यांना संभाजीनगर येथे उपचार करताना हा अपघात सकाळी 1 =30 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्झरी बस चालकाचे गाडीवरील संतुलन गेल्याने ही बस रस्त्यालगतच्या कठड्याला जाऊन धडकली त्यानंतर बसच्या डिझेल टॅंक मध्ये आग लागली व बसणे पेठ घेतला आगी नंतर तीन पाच सहा प्रवासी हे बाहेर निघू शकले उर्वरित 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला त्यामध्ये तीन बालकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलिसांनी दिली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.