अमेरिकेत उडणाऱ्या कारला परवानगी ; पहा काय आहेत वैशिष्ट्ये !

0

वॊशिंग्टन ;- अनेक चित्रपटांमध्ये कार उडत असताना आता हवेतही उडणारी कार तयार झाली असून अमेरिकेने नुकतेच एका कंपनीला उडणाऱ्या कारला अधिकृत परवानगी दिली आहे. अमेरिकेतील (अलेफ एअरोनॉटिक्स कंपनीने तयार केलेल्या या उडणाऱ्या कारला अमेरिकेतील सरकारने परवानगी दिली आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. पहिल्यांदाच उडाणारी कार सर्वांसमोर येणार आहे.

या उडणाऱ्या कारचं नाव ‘मॉडेल ए’ असं ठेवण्यात आलं आहे. यूएस फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) या गाडीला ‘स्पेशल एअरवर्थीनेस’ सर्टिफिकेशन दिलं आहे. अशा प्रकारच्या वाहनाला मंजूरी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अशी आहे कारची रचना

ही कार हवेत आणि रस्त्यावर देखील चालणार असल्याचं कंपनीने दावा केला आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरुपाची ही कार असणार आहे. रस्त्यावर ट्रॉफिक असेल तर ती कार तुम्ही हवेत उडवू शकता.रस्त्यावर ही कार 322 किमी रेंज तर हवेत चालवताना 177 किमी रेंजने जाण्याचे कंपनीने सांगितले आहे. अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार ह्या कारमध्ये किमान २ व्यक्ती हमखास बसू शकतात. ह्या कारची किंमत 3,00,000 डॉर्लस इतकी असू शकणार आहे असे कंपनीने सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.