बुलढाण्यात अपघातांची मालिका सुरूच, जखमींवर उपचार सुरु

0

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून, पुन्हा एकदा मलकापूर-बुलढाणा एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यांनतर बस घाटात पलटी झाली. या बसमध्ये एकूण ५५ प्रवासी प्रवास करत होते. या बसमध्ये २० विध्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. बस मलकापूर वरून बुलढाण्यास जाण्यास निघाली होती.

कसा घडला अपघात ?
घाट चढत असतांना पायथ्याशी असणाऱ्या चढावावर अचानक बस खाली येत असल्याने मालक आणि वाहकाच्या लक्षात आले. दरम्यान त्यांनी बसवर नियंत्रण साधण्याचा प्रयत्न केला. मात्र बस खाली येऊन रस्त्यालगतच्या झाडावर मागील बाजूने आदळली आणि बस रस्त्याच्या कडेला पटली झाली. जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.