ब्रेकिंग; ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा ४५ दिवसातच राजीनामा…

0

 

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क:

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी मोठ्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान कार्यालयात केवळ ४५ दिवस घालवल्यानंतर ट्रस यांनी हा राजीनामा दिला आहे. लिझ ट्रस या ब्रिटनच्या सर्वात कमी कालावधीच्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांच्या आर्थिक कार्यक्रमामुळे ब्रिटनच्या बाजारपेठेत गोंधळ निर्माण झाला आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षातील अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

लिझ ट्रस यांना त्यांच्या कर कपातीची सर्व धोरणे मागे घ्यावी लागली. नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी कर कपातीची त्यांची सर्व धोरणे उलथून टाकली. वाढीव वीज बिलावरील बंदीही हटवण्यात आली. लिझ ट्रस यांनी एका दूरचित्रवाणी भाषणात सांगितले की, मी ज्या जनादेशासाठी निवडून आले ते मी पूर्ण करू शकत नाही. यामुळे मी राजीनामा देत आहे. यापूर्वी त्यांनी आपल्या सरकारच्या आर्थिक धोरणांबाबत यू-टर्न घेतल्याबद्दल माफीही मागितली होती. आणि त्यांच्या सरकारच्या पहिल्या अर्थमंत्र्यांचा राजीनामा घेतला होता.

यानंतर भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन यांनीही ब्रिटनच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ब्रेव्हरमन यांची 43 दिवसांपूर्वीच गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान लिझ ट्रस यांनी 10 डाउनिंग स्ट्रीटवर पदभार स्वीकारला होता. तत्पूर्वी, ब्रेव्हरमन यांची बुधवारी पंतप्रधान ट्रस यांच्याशी बैठक झाली असून, सरकारी धोरणावर मतभेद निर्माण झाल्यामुळे याकडे पाहिले जात नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.