भडगावात आजारी वानराचा मृत्य; दफनविधी करून घडविले माणुसकीचे दर्शन

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या जंगलांमध्ये झाडाची कत्तल तसेच अनेक प्रकारचा ऱ्हास वाढल्याने जंगलातील प्राणी गावात, शहरांकडे येत आहे. शहरात येऊन सुद्धा त्यांच्या पोटाची खळगी भरत नाही. यामुळे ते अशक्त, आजारी पडतात व त्यांचा मृत्यू होतो. अशा अनेक घटना आपण पहिल्या असतील. अशीच एक घटना भडगाव शहरात घडली आहे.

भडगाव शहरात उज्ज्वल कॉलनी येथे वास्तव्यास असलेले अमोल पाखले यांच्या घराच्या गच्चीवर काल एक वानर आले. ते वयोवृध्द व आजारी असल्याने त्याला चालणे देखील मुश्किल होते. ही बाबत अमोल पाखले यांच्या निर्दशनास आली. त्यावेळी त्यांनी त्या वानराला काही खाऊ घातले व पाणी पाजले. काही वेळ गच्चीवर थांबून घरातील मंडळी खाली आले.

सायंकाळ झाली ते वानर गेले असेल असे  घरातील मंडळींना वाटले. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी गच्चीवर गेले असता त्या वानराची प्राणज्योत मावळली होती. यानंतर अमोल पाखले यांनी वनपाल, तसेच नगरपालिका कर्मचारी यांना बोलावले. या नंतर नगरपालिका कर्मचारी अजय कंडारे, सर्पमित्र विजय कंडारे, एन. पी. पाटील, मुकेश बोरसे वनपाल, रवि पाटील कर्मचारी, सुभाष राठोड, छोटू पाटील व अमोल पाखले यांनी अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य आणून त्या वानराचा भडगाव अमरधाम येथे दफनविधी करून माणुसकीचे दर्शन घडवले.

Leave A Reply

Your email address will not be published.