दीड लाखाची लाच; तलाठीसह मंडळ अधिकारी ACB जाळ्यात

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दीड लाखाची लाच स्वीकारताना तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात अटक केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी त्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे ३ डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले ३ डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्र. एमएच १८ AA ११५३ हे अमळनेर शहरात माती वाहतूक करताना सुमारे २ महिन्यापुर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आलेले होते.

यावर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे गणेश राजाराम महाजन (वय-५६ वर्ष, व्यवसाय नोकरी, तलाठी, अमळनेर शहर) आणि दिनेश शामराव सोनवणे (वय ४८ वर्षे, व्यवसाय नोकरी, मंडळ अधिकारी, अमळनेर) यांनी दोन लाखांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम दीड लाख इतकी ठरली. दरम्यान तक्रारदाराने याबाबत एसीबीच्या कार्यालयात तक्रार केली.

या तक्रारीनुसार  लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज पचासमक्ष दीड लाख रुपये स्वीकारताना वरील दोन्ही जणांना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी शशिकात एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय राजोग बच्छाव, पीआय एन. एन. जाधव स. फो. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ अशोक अहीर, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पोहे का. रविंद्र पुगे, म.पो.हे.को. शैला धनगर, पो.ना जनार्धन चौधरी, पो.ना. किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना. सुनिल वानखेडे, पो.ना. ईश्वर धनगर, पो.कॉ. महेश सोमवंशी, पो. कॉ. प्रदिप पोळ, पो. कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. सचिन चाटे, पो. कॉ. प्रणेश ठाकुर, पो. कॉ. अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.