मोठी बातमी; कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक…

0

 

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ एका एक्सप्रेस ट्रेनला अपघात झाला. बचावकार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. विशेष मदत आयुक्त कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आणि राज्य स्तरावरून अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास SRC ला कळवण्यास सांगितले आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. त्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरून घसरले. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची भीती आहे. बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.