Breaking : मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार कोसळलं !

0

भोपाळ : मध्य प्रदेशात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा अखेर शेवट झाला असून काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे. मुख्यमंत्री कलमनाथ यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. सर्वोच्च न्यायालयाने आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. मात्र पुरेसं संख्याबळ नसल्याने बहुमत चाचणीआधीच कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसचं सरकार कोसळलं.

विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी १६ बंडखोर आमदारांचे राजीनामेही स्वीकारले आहेत. यापूर्वीही सहा आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यात आले होते. मध्य प्रदेश विधानसभेतील 230 पैकी 2 आमदारांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. 228 जागांपैकी 22 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर 206 जागा शिल्लक आहेत. अशावेळी बहुमत सिद्ध करण्याचा आकडा 104 होतो. कॉंग्रेसकडे आधी 114 आमदार होते. मात्र आता सभापतींसह 92 आमदार आहेत. सपा, बसप आणि अपक्ष आमदार धरता हा आकडा केवळ 99 पर्यंत पोहोचतो. तर भाजपकडे 107 आमदार आहेत. अशा परिस्थितीत भाजपा सध्याच्या संख्याबळाच्या जोरावर सरकार बनवू शकते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.