पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द ; सरकारचा निर्णय

0

मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह महाराष्ट्रातही कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  दरम्यान, करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळी पावले उचलण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.  तर 10वीच्या परीक्षा या वेळापत्रकानुसार होणार असून नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होणार असल्याचं शिक्षणमत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं आहे.


वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मार्क्स देण्यात आलं आहे. हे सर्व निर्णय राज्य बोर्डाच्या बाबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही 31 मार्चपर्यंत राज्यात महत्त्वाचे बदल केले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.