लखनऊ- बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कनिका १५ मार्चला लंडनहून भारतात परतली होती. धक्कादायक बाब म्हणजे कनिकाने करोना विषाणूशी पीडित असल्याची गोष्ट लपवली आणि शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिली. तिथेच तिने पार्टीही दिली होती. या पार्टीला सुमारे ५०० लोक उपस्थित होते. आता आरोग्य विभाग कनिकाच्या पार्टीला उपस्थित राहिलेल्या लोकांचा शोध घेत आहे.
कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडनवरून भारतात परतली होती. तिला कोरोना झाल्याची माहिती तिनं काही दिवस सर्वांपासून लपवून ठेवली होती. असंही म्हटलं जात आहे की काही दिवसांपूर्वी लंडनवरुन भारतात परतल्यावर कनिकानं एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. ज्यात राजकीय वर्तुळातील अनेक नेते आणि जज यांच्यासह जवळपास ५०० लोक सामील झाले होते. तसेच एका व्यवासायिकाच्या पार्टीत देखील कनिका उपस्थित राहिली होती. यामुळे कनिकाला भेटलेल्या लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कनिकाच्या घरात सहा जण असून त्यांची देखील तपासणी केली जाणार आहे
कनिकानं तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता तिच्या सोशल मीडिया अकउंटवरुन शेअर केली आहे.कनिकानं लिहिलं, ‘मागच्या 4 दिवसांपासून मला तापाची लक्षण दिसत होती. त्यामुळे मी टेस्ट करुन घेतली आणि माझी COVID-19 टेस्ट पॉझिटीव्ह आली. मी पूर्णपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे.’