ब्रेकिंग; दुध संघाचे कार्यकारी संचालक पोलिसांच्या ताब्यात

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जळगाव जिल्हा दुध संघात रोज नवनवीन घडामोडींना वेग येतांना दिसत आहे. त्यातच आता जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी दुध संघाच्या कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक केली आहे.

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्मचाऱ्यांवर जबाब बदलण्यासाठी पोलीस दबाव टाकत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आला होता. यानंतर आज दुध संघासाठी अर्ज छाननी करण्यात आल्यानंतर रात्री दुध संघाचे कार्यकारी संचालक (एमडी) मनोज लिमये यांना शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यानाच्या कालखंडात या प्रशासक मंडळाने कागदपत्रांची झाडाझडती घेऊन दुध संघात अपहार झाल्याचे शोधून काढले होते. यात दुध आणि लोणी यांच्या विक्रीत अपहार झाल्याची फिर्याद देण्यात आली होती. तर संचालक मंडळाने हा अपहार नसून चोरी असल्याचा युक्तीवाद करून दुसरी तक्रार नोंदविली होती. यासाठी आमदार एकनाथराव खडसे यांनी शहर पोलीस स्थानकात ठाण मांडून आंदोलन केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.