कोचिंग क्लासमध्ये १८ वर्षाच्या मुलाला हृदयविकाराचा झटका; आधी बेशुद्ध… आणि नंतर…

0

 

इंदोर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये एका 18 वर्षीय विद्यार्थ्याचा कोचिंग क्लासदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी घडली. माधव असे या मुलाचे नाव असून, तो शहरातील भंवरकुआन भागातील रहिवासी होता आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (MPPSC) प्रवेश परीक्षेसाठी प्रशिक्षण घेत होता. वर्गात असतानाच त्यांना छातीत दुखू लागले. ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सीसीटीव्हीमध्ये काळ्या रंगाचा शर्ट घातलेला मुलगा इतर विद्यार्थ्यांजवळ बसलेला दिसत होता. 32 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये माधव सुरुवातीला चांगला दिसत होता, सरळ बसून त्याच्या पुस्तकांवर लक्ष केंद्रित करत होता. अचानक तो टेबलाकडे वाकला, त्याला काहीतरी अडचण येत असल्यासारखे वाटले. इतक्यात त्याच्या शेजारी बसलेला मुलगा खाली वाकून माधवच्या पाठीला हात लावू लागला. आणि त्याला विचारले की त्याला वेदना होत आहेत का? त्यानंतर ही बाब तातडीने शिक्षकांना सांगितली. काही सेकंदांनी माधव टेबलावरून पूर्णपणे घसरला आणि जमिनीवर पडला.

‘सायलेंट हार्ट अटॅक’ची चिंता

माधव पडताच तेथे बसलेल्या विद्यार्थ्यांनी परिस्थिती समजून त्याच्याकडे धाव घेतली. त्यानंतर माधवला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र काही तासांतच त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या मृत्यूने पुन्हा एकदा ‘सायलेंट हार्ट अटॅक’ची चिंता वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गेल्या काही आठवड्यात एकट्या इंदूरमध्ये सुमारे चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.