चोपड्यात पुन्हा शस्त्रे आढळली; दोघांना अटक…

0

 

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

चोपडा शहरातील बसस्थानकात हरियाणाच्या दोघांना तब्बल १२ कट्ट्यांसह सापळा रचून अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कट्टे सापडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दि. 22 ऑगस्ट 2022 रोजी सांयकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास चोपडा बस स्थानक परिसरात संशयित आरोपी अमीतकुमार धनपत धानिया (30) व शनेशकुमार रामचंदर तक्षक (32) दोघेही रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी, हरीयाणा, यांच्याकडे 2 लाख ६० हजार किमंतीचे १२ गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच हजार रुपये किमंतीची 5 पिवळया धातूचे जिवंत काडतूस आढळले आहे. त्यांनी ते विक्री करण्यासाठी आणले होते. परंतू पोलिसांनी दोघांना सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. दोघं संशयित आरोपींवर पोहेकॉ किरण गाडीलोहार यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघं संशयित आरोपींजवळून १२ गावठी बनावटीचे कट्टे, ५ जिंवत काडतूस व ३ मोबाईल फोन असा एकुण २७७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण, सहा. पोलीस निरिक्षक अजित साळवे व संतोष चव्हाण यांनी भेट दिली. दि. 18 ला सुद्धा अवैध शस्त्रांसंबंधी अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी 6 गावठी कट्टे व 30 जिंवत काडतुसे जप्त करण्यात आली होती. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे, पोलीस नाईक संतोष पारधी, संदिप भोई, किरण गाडीलोहार, पोकाँ. प्रमोद पवार, प्रकाश मथुरे आदिंच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.