बोरी धरणाचे १२ दरवाजे उघडले

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणाचे बारा दरवाजे उघडल्याने नदी पात्रात अठरा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग बोरी नदी पात्रात होत आहे.  बोरी नदीच्या उगमस्थानी एक सारखा जोरदार पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक धरणात वाढलेली आहे. तरी नदीकाठवरील गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.

आज दि. १९/९/२०२२ रोजी सकाळी तामसवाडी प्रकल्पाची स्थिती

बोरी मध्यम प्रकल्प, तामसवाडी, ता. पारोळा जि. जळगाव

बोरी धरणाची पाणी पातळी  २६७,१० मी.

उपयुक्त साठा टक्केवारी = १००%

सकाळी ८ वा. धरणाचे १२ दरवाजे ०,३० मी  व ०,३ दरवाजा ०,६० ने उघडून १५९५४  क्युसेस विसर्ग नदी पात्रात  सुरु आहे.  विसर्ग वाढवण्यात  आला आहे, तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच कोणीही नदीपात्रात उतरू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बोळे तामसवाडी रस्ता बंद

बोरी धरणात पाण्याची आवक वाढल्याने बोळे ते तामसवाडी रस्ता काही तासांसाठी बंद करण्यात आला आहे.  धरणाचे पाणी जास्त सोडण्यात आले आहे,  त्यामुळे सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.