जीपीएसचे प्राचार्य सचिन पाटलांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

0

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, पाळधी येथील युवा प्राचार्य सचिन पाटील सर यांना यावर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2021-22  प्रदान करण्यात आला.

अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात, राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेमार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे जीपीएसचे युवा प्राचार्य सचिन नाना पाटील मानकरी ठरले. सदर सन्मान सोहळ्यास आमदार राजू मामा भोळे, डॉ. केतकी पाटील, पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील, राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वाघ मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

अगदी तरुण वयात प्राचार्य पदी विराजमान झाल्यानंतर आपल्या वकृत्वाने व कर्तृत्वाने अल्पावधीत शिक्षण क्षेत्रात नावाजलेले, आपल्या उपक्रमशीलतेमुळे ओळखले जाणारे, व्यवस्थापन, पालक तसेच विद्यार्थ्यांच्या गळ्यातल्या ताईत असणारे जवखेडा बुद्रुक येथील निवासी सचिन पाटील यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यापूर्वीही प्राचार्य सचिन पाटील यांना भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार, सरस्वती सन्मान 2021-22, आदर्श प्राचार्य पुरस्कार आदी प्रदान करण्यात आले आहे. अगदी तरुण वयात आपल्या कर्तृत्वाच्या ठसा उमटवणाऱ्या सचिन पाटील यांचे जीपीएसचे सर्वेसर्वा गुलाबराव पाटील व प्रतापराव पाटील यांनी अभिनंदनपर सत्कार करून कौतुक केले.

आपल्या अनोख्या भाषणाने सभागृहात उपस्थित सर्वांची मने जिंकणाऱ्या सचिन पाटील यांचे शिक्षणाधिकाऱ्यांसह सर्वच मान्यवरांनी कार्यक्रमाप्रसंगी विशेष कौतुक व अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.