Saturday, January 28, 2023

सोन्याच्या दरात घसरण तर चांदी वधारली; पहा आजचे नवे दर

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर जाहीर झाले आहेत. ताज्या दरानुसार सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.  दहा ग्रॅम सोने आज 49328 रुपयांना विकले जात आहे, तर 999 शुद्धतेचे एक किलो चांदीचे दर 55144 रुपयांवर पोहोचले आहेत.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 49328 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. आज सोन्याचा दर 13 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे. सोन्याचे दर उच्चांकी किमतीपेक्षा स्वस्तच मात्र यानंतरही सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 6872 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे.

- Advertisement -

तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज चांदीचा दर 56350 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 55144 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 1206 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे