मोठा निर्णय.. ‘या’ दिवसापासून मिळणार मोफत बुस्टर डोस

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. म्हणून सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे.

या 75 दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दोन्ही डोस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील प्रतिपिंडाची पातळी सुमारे सहा महिन्यांनी कमी होत आहे. अशा परिस्थितीत बूस्टर किंवा सावधगिरीचा डोस दिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारने 75 दिवसांसाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत 18 ते 59 वयोगटातील लोकांना सरकारी केंद्रांवर कोरोनाचा मोफत बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.