मुलबाळ होत नसल्याने छळ; जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क

मूलबाळ होत नसल्याने बोदवड येथे विवाहितेचा छळ केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती, चुलत सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

भावना नीलेश महाजन (वय २७) असे मयत विवाहितेचा नाव आहे. भावना महाजन या बोदवड येथील गोरक्षनाथनगरमधील रहिवासी आहेत. त्यांनी २१ मार्च रोजी राहत्या घरी सकाळी साडेसहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

भावना व नीलेश सुभाष महाजन यांच्या लग्नाला सहा ते सात वर्षे झाली होती. मात्र त्यांना मूलबाळ होत नव्हते. यामुळे पती व चुलत सासरे व सासू यांनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्याने आत्महत्येला प्रवृत्त केले.

याप्रकरणी भूषण अशोक माळी (रा. असोदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नीलेश सुभाष महाजन, चुलत सासरे प्रकाश दौलत महाजन व चुलत सासू मंगला प्रकाश महाजन (सर्व रा. गोरक्षनाथनगर, बोदवड) यांच्यावर बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत विवाहितेची जळगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह असोदा येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पती नीलेश महाजन व चुलत सासरे प्रकाश महाजन यांना अटक करण्यात आली आहे. तर चुलत सासू मंगला महाजन यांना मंगळवारी अटक करण्यात येणार आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शरद माळी तपास करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.