भयंकर..18 वर्षीय हिंदू मुलीची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

0

पाकिस्तान, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. सिंध प्रांतांमध्ये एका 18 वर्षीय मुलीवर गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आली आहे. सुक्कुर शहरामधील रोही परिसरात हा सर्व भयंकर प्रकार घडला आहे. या तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अयशस्वी ठरल्याने अपहरणकर्त्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरुन पळ काढला. मृत्यू झालेल्या मुलीच नावं पुजा ओड असं आहे.

पीपल्स कमिशन फॉर मायनॉरिटीज राइट्स आणि सेंटर फॉर सोशल जस्टिसच्या म्हणण्यानुसार, पूजाचं आधी रस्त्यावर अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिने यासाठी विरोध केल्यावर हल्लेखोरांनी तिला रस्त्याच्या मध्यभागी गोळ्या घातल्या. दरवर्षी अल्पसंख्याक समुदायातील, विशेषतः सिंधमधील महिलांचं अपहरण केलं जातं आणि जबरदस्तीने त्यांचं धर्मांतरण करतात, असं वृत्त स्थानिक मीडियाने दिलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायांना दीर्घकाळापासून जबरदस्तीने विवाह आणि धर्मांतराचा सामना करावा लागत आहे. सिंध प्रांतात धर्म परिवर्तन आणि जबरदस्तीने विवाह केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशात आता पुन्हा एकदा असंच प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये एका 18 वर्षीय तरुणीवर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे. 2013 ते 2019 या कालावधीत धर्मांतराच्या 156 घटनांची नोंद झाली आहे. पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येपैकी 1.60 टक्के हिंदू लोकसंख्या आहे. तर सिंध प्रांतामधील एकूण लोकसंख्येच्या 6.51 टक्के लोक हिंदू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.