१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार

0

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

पहूर तालुक्यामधील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. गावातील गणेश शांताराम पवार याने इसमाने पीडित मुलीला १८ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता घरातून फूस लावुन पांढऱ्या गाडीत पळवून नेले.

दरम्यान एका गावाजवळील रस्त्यावर थांबून गाडीतच तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत मुलीने पहूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश शांताराम पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.