ब्रेकिंग ! पाकिस्तानात बॉम्बस्फोट, ५२ ठार तर ५० जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज  पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या मस्तुंग येथे मशिदीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. यात किमान ५२ जण ठार झाले, तर सुमारे ५० जण जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त लोक जमत असलेल्या मशिदीजवळ हा स्फोट झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

https://x.com/Jaffar_Journo/status/1707679155566047733?s=20

शहीद नवाब घोस बख्श रायसानी मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सईद मिरवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २८ मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत, तर २२ मृतदेह मस्तुंग जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तर रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती लागू करण्यात आहे. उपमहानिरीक्षक (डीआयजी) मुनीर अहमद यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, “आत्मघाती बॉम्बरने पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) यांच्या वाहनाजवळ स्फोट घडवून आणला.” हा स्फोट एका मशिदीजवळ झाला जिथे लोक ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्तच्या मिरवणुकीसाठी जमले होते.

मस्तुंगचे साहाय्यक आयुक्त अत्ता उल मुनीम यांनी सांगितले की, या स्फोटाची तीव्रता मोठी आहे. मदिना मशिदीजवळ हा स्फोट झाला. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मस्तुंगचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) नवाज गशकोरी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. प्रांतीय काळजीवाहू माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांना क्वेटा येथे हलवण्यात आले असून शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये आपत्कालीन स्थिती लागू करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.