अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या नावे केला ‘हा’ रेकॉर्ड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने नवीन फिचर व्हॉट्सअ‍ॅपवर समाविष्ट केले आहे. या फिचर अंतर्गत असंख्य माध्यमांनी, सेलिब्रिटींनी स्वतःचं चॅनल उघडलं आहे. या चॅनलच्या माध्यमातुन असंख्य सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातले खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

अशातच अभिलेत्री कतरिनाने तिच्या नावे एक रेकॉर्ड केला आहे. अभिनेत्री कतरिना कैफने (Actress Katrina Kaif) व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) चॅनलवर उघडताच तिचे 15.3 मिलियन फॉलोअर्स झाले. त्यामुळे कतरिना कैफ व्हॉट्सअ‍ॅप चॅनलची सर्वाधिक फॉलोअर्स असलेली अभिनेत्री ठरली आहे.

बॉलिवूड स्टार कैटरीना कैफने व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर एक उल्लेखनीय म्हणजेच 15 मिलीयन फॉलोअर्सचा टप्पा गाठणारी पहिली सेलिब्रेटी ठरली आहे. सोबतच तिच्या नावे रेकॉर्ड सुद्धा झाला आहे. ती रेकॉर्ड करणारी आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर सर्वाधिक फॉलो केली सेलिब्रिटी ठरली आहे. अगदी व्हॉट्सअ‍ॅप कंपनीचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आणि गायक/रॅपर बॅड बनी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींना सुद्धा तिने मागे टाकले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.