जळगाव ;- भारतीय जनता पक्षात अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर उफाळून येत असून कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांसमोर उमेदवाराची खरडपट्टी काढत असल्याने श्रेष्ठींनाही डोक्याला हात लावून घ्यावा लागत आहे.
मध्यंतरी झालेल्या भाजपाच्या बैठकीतील व्हिडीओ समोर आला असून एक कार्यकर्ता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच रावेरच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांना खडेबोल सुनावत आहे. तुमच्या गाडीत ‘तुतारी’चे कार्यकर्ते नेहमी असतात असे सांगून हा कार्यकर्ता चांगलच संतापला आहे. खुद्द मंत्री गिरीश महाजन त्याला शांत करीत असतांनाही त्याने सत्य परिस्थिती सर्वांसमोर सांगितल्याने उपस्थित आमदार राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, स्मितातार्इ वाघ अवाक् झाले. एकंदरीत रावेरच्या जागेवरुन भाजपात अंतर्गत धूसफुस मोठ्या प्रमाणावर असून ती उफाळून येवू नये यासाठी श्रेष्ठींना मेहनत घ्यावी लागणार आहे.