Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भाजप आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, गाडी थेट 30 फूट खोल..
    गुन्हे वार्ता

    भाजप आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, गाडी थेट 30 फूट खोल..

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 24, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. फलटण येथे आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात आमदार गोरे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली.#BJP #Satara #JaykumarGore #CarAccident #JaykumarGoreNews #ViralVideo #SataraNews #SataraBrecking pic.twitter.com/ETVfPT4HFa

    — Satish Daud Patil (@Satish_Daud) December 24, 2022

    त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून डॉ. कपिल झिरपे यांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीसंदर्भात माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, सुदैवाने जयकुमार गोरे यांना अपघातात जास्त दुखापत झालेली नाही. ते शुद्धीवर आले असून आता बोलत देखील आहे. त्यांची पल्स आणि बीपी व्यवस्थित आहे. छातीला थोडासा मार लागला आहे.पॅनिक व्हायची गरज नाही.पेनकिलर दिल्याने त्यांना बरं वाटत आहे, असं डॉ. झिरपे यांनी सांगितलं आहे.

    असा झाला गोरे यांच्या गाडीचा अपघात

    आमदार जयकुमार गोरे हे पुण्याहून आपली गावी दहिवडीकडे जात होते. सकाळी साडेपाच वाजता त्यांची गाडी फलटण येथील बानगंगा नदीच्या पुलावर आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. यावेळी गाडीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. या अपघातात गोरे यांच्यासह त्यांचे अंगरक्षक आणि चालकही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जणांना उपचारासाठी तातडीने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    BJP MLA Car accident BJP MLA Jayakumar Gore Satara
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट

    October 12, 2026

    पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त

    October 12, 2026

    ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif