मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचे कमळ फुलले ; मोदींची जादू चालली !

0

देशात भाजप कार्यकर्त्यांचा ढोल ताशे वाजवून जल्लोष ;

नवी दिल्ली ;- देशातील चार राज्य म्हणजेच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूकांची मतमोजणी सुरू असून चार राज्यांच्या सुरुवातीच्या निकालात तीन राज्यात भाजपने आघाडी मिळवली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेसने बाजी मारल्याचे आतापर्यंतच्या निकालांवरून दिसून येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन राज्यातील निकालावरून जादू चालली असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. सकाळी मतमोजणीपूर्वी काँग्रेसकडून दिल्ली आणि भोपाळमध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

दुसरीकडे, तीन राज्यात आघाडी मिळाल्यानंतर आता भाजपने सुद्धा जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, देशाच्या सर्वच भाजपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. त्यातच आता संध्याकाळी ५ वाजता भाजप मुख्यालयात जल्लोष साजरा करणार आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी 6.30 वाजता भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. यावेळी जनतेते आणि कार्यकर्त्यांचे मोदींनी आभार मानणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा असून स्पष्ट बहुमतासाठी ११६ जागांची गरज आहे. आतापर्यंतच्या कलानुसार १६२ जागांवर भाजपची आघाडी असून राजस्थानमध्ये विधासभेच्या 200 जागा आहेत. त्यापैकी 199 जागांवर मतदान झाले आहे. आतापर्यंत निकालानुसार १०९ जागांवर भाजपची मुसंडी पाहायला मिळत आहे. तर काँग्रेसला ७४ जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे चित्र आहे.

छत्तीसगड विधानसभेसाठी 90 जागांवर मतदान झाले. परंतु आता याठिकाणी भाजपने ५४ जागांवर आघाडी घेतली आहे. याठिकाणी भाजप ५४ जागांवर आघाडीवर असून सुरूवातीच्या कलामध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच टक्कर दिसून आली. याचबरोबर, तेलंगणात विधानसभेसाठी 199 जागांवर मतदान झाले. या ठिकाणी के.चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष ४१ जागा मिळवून सत्तेतून जात आहे. तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून सुरुवातीच्या आकडेवाडीनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेसला ६५ जागांवर आघाडी मिळाली असून बीआरएसला केवळ ४१ जागांवर आघाडी मिळताना दिसून येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.