धक्कादायक; गर्ल्स होस्टेलच्या वसतिगृहातील शौचालयात आढळले मृत अर्भक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वर्ध्यातील सावंगी मेघे परिसरात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृयहाच्या शौचालयात मृत अर्भक आढळले आहे. याप्रकरणी वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्याने पोलिसात तक्रार दिली आहे. सावंगी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

वैद्यकीय महाविद्यालय परिसराला लागून असलेल्या सरस्वती वसतिगृह आहे. या वस्तीगृहाच्या ग्राउंड फ्लोरवर असलेल्या शौचालयाच्या खड्ड्यात अज्ञाताने मृत अर्भक फेकलं होतं. याची माहिती वसतिगृहात काम करणाऱ्या महिलेला मिळताच त्यांनी पाहणी केली. याबाबतची तक्रार त्यांनी तत्काळ सावंगी पोलिसांत दिली.

पोलिसांनी तात्काळ गाठून तपासणी केली असता, अर्भक मृतावस्थेत असल्याचे अज्ञातांनी मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असेच पुढील पोलिसांकडून केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.