अजब लग्नाची गजब गोष्ट, लग्नात आणला चक्क प्रोजेक्टर केक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हमखास केक कापतात. सध्या प्रेत्येक शुभकार्यात केक कापणे हे नवीन राहले नाही. जसा कार्यक्रम असेल तशा प्रसंगानुरूप बाजारात केक विकत मिळत असतात. सध्या सोशल मीडियावर एका विशेष केकची तुफान चर्चा होते. तो केक म्हणजे प्रोजेक्ट केक

 

प्रोजेक्टर केक
व्हायरल होत असलेला व्हडिओ एका लग्नासाठी रिसेप्शनमधील आहे. यात आपल्याला स्टेजवर नवरा-नवरी दिसत आहेत. सुंदर नटलेल्या दोघांच्या समोर एका टेबलवर पांढऱ्या रंगाचा टप्याटप्यांचा केक दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीस पांढऱ्या केकवर प्रिजेक्टरच्या लाईट्य सुरू झाल्या. प्रोजेक्टरमधून केकवर नवरा-नवरीचे फोटो आणि नाव केकवर दिसत आहे. शेवटी नवरा-नवरी केक कापताना दिसत आहेत. तसेच केकवर अनेक प्रकारचे चित्र उमटताना दिसत आहेत.

प्रोजेक्टर केकचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसंच या व्हिडिओवरून नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहे. काही युजरच्या कमेंटवरून असे दिसत आहे की, काही युजर्सला केक आवडलेला दिसतोय तर काही युजर्सनी या केकला नापसंती दर्शवली आहे. व्हायरल व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.