धक्कादायक; गाडीचा अचानक स्पोट; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू…

0

 

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

उन्हाचा तडाखा हा काय असतो हे सांगण काही नवीन नाही. आणि त्यामुळे होणारी त्रासदीही अनेकांसाठी काही नवीन नाही. मात्र अमरावतीच्या अचलपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अचलपूर येथे एक शेतकरी रस्त्यानं जात असताना अचानक त्याच्या दुचाकीचा स्पोट झाला, हा स्फोट एवढा भयंकर होता की या घटनेत शेतकऱ्याचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर उर्फ नंदू मधुकरराव गणगणे(42) रा माळीपुरा, अचलपूर असं या मयत शेतकऱ्याचं नाव आहे.

मशागतीचं काम अंतिम टप्प्यात येऊन शेतात सध्या पेरणीची लगबग सुरू आहे. मशागतीदरम्यान अचानक ट्रॅक्टर ना दुरुस्त झाल्यानं काम रखडलं होतं. त्यामुळे नंदू गणगणे हे आपल्या मोपेडवरू ट्रॅक्टर दुरुस्त करण्याचे साहित्य आणि इतर सामान घेऊन शेताकडे जात होते. त्यांनी त्यापूर्वी आपल्या गाडीमध्ये पेट्रोल देखील भरले होते. दरम्यान ही दुचाकी सिद्धिविनायक मंगल कार्यालय परिसरात आली, तेव्हा तिचा अचानक स्फोट झाला. रस्ता निर्जन होता, त्यामुळे रस्त्यावर कुणीही नसल्यानं गणगणे यांना वेळीच मदत पोहोचू शकली नाही. वेळेवर मदत न मिळाल्यानं अखेर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.