बिजापूर येथे चकमकीत ९ नक्षलवाद्यांचा खात्मा

0

बीजापूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत उडालेल्या चकमकीत सुरक्षा न दलांनी ९ नक्षल्यांना कंठस्नान घातले. जिल्ह्यातील लेंड्रा गावाच्या घनदाट जंगलात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली

. गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेंड्रा गावाच्या जंगलात नक्षली सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून सोमवारी शोध अभियान उघडण्यात आले होते. जिल्हा राखीव गार्ड, विशेष कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कोब्रा बटालियनच्या संयुक्त पथकाकडून जंगलात अभियान सुरू असताना मंगळवारी सकाळी नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर नक्षली फरार झाले.

यानंतर घटनास्थळावरून ९ नक्षलवाद्यांच्या मृतदेहासह एक एलएमजी ऑटोमेटिक शस्त्र, बीजीएल लाँचर, इतर शस्त्र आणि स्फोटके जप्त करण्यात आले. चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चकमकीनंतर या भागात अजूनही शोध अभियान सुरू आहे. ताज्या चकमकीबरोबर चालू वर्षात सुरक्षा दलाने बीजापूर जिल्ह्यासह बस्तर भागात आतापर्यंत ४२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. नक्षलग्रस्त सुकमा जिल्हा बस्तर लोकसभा मतदार संघात असून याठिकाणी १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात मतदान होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.