ट्रॅक्टरला ट्रकची धडक; भीषण अपघातात चौघांचा मृत्यू ; ९ जण गंभीर जखमी

0

कवठेमहांकाळ : – ऊसतोड मजुरांना शिरोळहून सांगोल्याकडे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली . ऊसतोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्याने रस्त्यालगत थांबलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून ट्रकने धडक दिली. मृतांमधील तीनजण चिखलगीचे, तर एकजण शिरनांदगीचा रहिवासी आहे. या अपघाताचे वृत्त

समजताच चिक्कलगी किंवा शिरनांदगी या गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात शालन दत्तात्रय खांडेकर (३०, रा. शिरनांदगी, ता. सांगोला), लगमव्वा तम्माराय्या हेगडे (३५), रितेश आप्पारय्या ऐवळे (१७), निलाबाई परशुराम ऐवळे (३, रा. चिक्कलगी, ता. मंगळवेढा) हे चौघे जागीच ठार झाले.
तसेच श्रीदेवी तम्माराया ऐवळे (२५), नकुशा परशुराम बिरुनगी (२७), जयश्री भिमान्ना ऐवळे (२६), बनाव्वा सुरेश बिरुनगी (४०), लक्ष्मी परसू ऐवळे (१), अशी जखमींची नावे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.