‘बिग बॉस-17’ चा विजेता मुनव्वर फारुकी; मिळाले ट्रॉफीसह लाखो..

अफेअर्स ते तुरुंगाची हवा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बिग बॉस हा प्रोग्रॅम नेहमी चर्चेत असतो. छोट्या पडद्यावरील या कार्यक्रमाला प्रचंड प्रेक्षक वर्ग आहे. सध्या बिग बॉसचा 17 वा सीजन सुरु असून याचा विजेता देखील घोषित झाला आहे. बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा मुनव्वर फारुकी हा विजेता ठरला आहे. मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि मन्नार चोप्रा  हे बिग बॉस-17 या कार्यक्रमाचे टॉप-3 स्पर्धक ठरले. यापैकी मुनव्वर फारुकीनं बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

सलमान खाननं  मुनव्वर फारुकीला बिग बॉस-17 या कार्यक्रमाची ट्रॉफी दिली. मुनव्वरला 50 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे. बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला. मुनव्वर हा बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा महाविजेता ठरला आहे. मुनव्वरचा आज वाढदिवस आहे. मुनव्वरसाठी त्याचा हा वाढदिवस खास ठरला आहे, कारण त्याला बिग बॉस-17 ची ट्रॉफी मिळाली आहे.

कोण आहे मुनव्वर फारुकी?

मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन, रॅपर आणि गायक आहे. मुनव्वरचा जन्म गुजरातमधील जुनागढमध्ये एका मुस्लिम कुटुंबात झाला आहे. घरच्या आर्थिक अडचणींमुळे मुनव्वरने पाचवीनंतर शिक्षण सोडलं. शाळा सोडल्यानंतर त्याने समोसे, चकल्या वनवण्याचं आणि विकण्याचं काम केलं आहे.

वादाच्या भोवऱ्यात

मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे. तो विविध शहरांमध्ये जाऊन स्टँडअप कॉमेडी करतो. मुनव्वर त्याच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. अनेक वेळा मुनव्वर हा त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोमध्ये केलेल्या विनोदांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. कंगना  रनौतच्या  लॉक-अप या शोमुळे मुनव्वरला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. 70 दिवस मुनव्वर हा लॉक अप कार्यक्रमामध्ये होता. हा कार्यक्रम जिंकल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफी, 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, गाडी हे मिळाले. तसेच त्याला इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली आहे.

मुनव्वरच्या आईची आत्महत्या

मुनव्वरची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती. त्याची आई आणि आजी समोसे विकून उदरनिर्वाह करायचे. समोसे बनवताना त्यांचा हात अनेकदा भाजला आहे. पण तरीही ते काळासोबत जगायला शिकले. त्यांच्यावर 3,500 रुपयांचं कर्ज होतं. हे कर्ज फेडला न आल्याने मुनव्वरच्या आईने आत्महत्या केली होती. 2020 मध्ये त्याच्या वडिलांचे अर्धांगवायूमुळे निधन झाले.

अफेअर्स ते तुरुंगाची हवा 

मुनव्वर फारुकी त्याच्या कामासह अफेअर्समुळे अनेकदा चर्चेत आला आहे. मुनव्वरचं कमी वयात लग्न झालं होतं. त्याला एक मुलगाही आहे. पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच मुनव्वरला त्याच्या मुलाची कस्टडी मिळाली. घटस्फोटानंतर मुन्नवरने आयेशा खान आणि नाजियाला डेट केलं आहे. मुनव्वरने तुरुंगाची हवादेखील खाल्ली आहे. 2021 मध्ये त्याने गृहमंत्री अमित शाह यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर त्याला इंदोरमधून अटक करण्यात आली. जवळपास एक महिना तो तुरुंगात होता. विनोदवीराने अनेकदा हिंदू देवी देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. मुनव्वरचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही तो चांगलाच अॅक्टिव्ह आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.