कांदे उधार मागितल्याच्या कारणावरून भाजीपाला विक्रेत्याला दमदाटीसह शिवीगाळ

0

भुसावळः शहरातील सोमानी गार्डन परिसरात कांदे उधार मागितल्याच्या कारणावरून एका भाजीपाला विक्री करणाऱ्या तरुणाला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्रम शाह हुसेन शाह (वय-२०, रा. मामाजी टॉकीज जवळ, भुसावळ) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून भाजीपाला विक्रीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. २५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता तो हात गाडीवर कांदे विक्री करत असताना, त्या ठिकाणी सावंत गणेश अग्रवाल हा कांदे घेण्यासाठी आला. दरम्यान त्यांनी कांदे उधार मागितले पण भाजीपाला विक्री करणारा आक्रमशहा याने कांदे उधार दिले नाही.

याचा राग आल्याने सावन अग्रवाल याने त्याला शिवीगाळ करत दमदाटी केली. हा प्रकार घडल्यानंतर रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.