झाडाला गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

0

जळगाव :- मुलाच्या घरी जात असताना वाटेतच एका झाडाला चिंतामण किसन जोगी (वय ७५, रा. एकलग्न, ता. धरणगाव) यांनी गळफास घेतला. मात्र हा प्रकार याच रस्त्याने जाणाऱ्या काही नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांनी जोगी यांना खाली उतरवल्याने त्यांचा जीव वाचला. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

धरणगाव तालुक्यातील एकलग्न येथील चिंतामण किसन जोगी हे शनिवारी पारोळा तालुक्यातील तरवाडे येथे लहान मुलाकडे जाण्यासाठी घरून निघाले होते. मात्र तेथे पोहचण्यापूर्वीच त्यांनी वाटेत एका झाडाला गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार त्याठिकाणाहून जाणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच चिंतामन जोगी यांना खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.