१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भुसावळमधून उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

भुसावळ शहरातील खडकारोड भागात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. भावेश योगेश तायडे (वय १८ रा. भुसावळ) याने २३ जुलै रोजी सकाळी ८ ते ११ वाजेच्या दरम्यान मुलीला तिच्या शाळेच्या गेट समोर भेटून तिला दुचाकीवर बसून भुसावळ रेल्वे कॉटरच्या मागे जाऊन तिच्याशी अंगलट करत लग्नाची आमिष दखवले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा १९ ऑगस्ट रोजी देखील हाच प्रकार केला. दरम्यान १० ऑक्टोबर रोजी देखील तिला पुन्हा लग्नाची आमिष दाखवत घर सोडून माझ्या घरी ये, असे सांगितल्याचा प्रकार समोर आला.

दरम्यान सदर घटना मुलीच्या नातेवाईकांना समजल्यानंतर मुलीसह त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी भावेश योगेश तायडे (वय १८, रा. भुसावळ) याच्यावर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.