भाजप शहराध्यक्षाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

0

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क

बीड येथील भाजपचे शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.

भाजपचे शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज दुपारी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून हत्या केल्या. गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यामुळे एकच खळबळ उडाली. बियाणी यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

बियाणीचे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांच्या घराकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने बियाणी यांच्या घरी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर बियाणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच खासदार प्रीतम मुंडे यांनी रुग्णालयात धाव घेतली. कार्यकर्ते आणि पोलिसांशी संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली. बियाणी यांच्या आत्महत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.