खडसेंना धक्का.. राष्ट्रवादीचे ५ माजी नगरसेवक पुन्हा भाजपात

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. खडसेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी सोमवारी पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. त्यांचा आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. भाजपचे शहरप्रमुख परीक्षित बऱ्हाटे, माजी नगरसेवक युवराज लोणारी, प्रमोद सावकारे, अजय नागराणी, गिरीश महाजन, निकी बतरा आदी उपस्थित होते. यामुळे खडसे गटाला मोठे खिंडार पडले आहे.

१७ डिसेंबर २०२१ रोजी पालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपण्यापूर्वी भाजपच्या ९ नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात तात्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यापैकी माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक अॅड. बोधराज चौधरी, माजी नगरसेविका शैलजा नारखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे, माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे व अनिकेत पाटील यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी देखील दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले होते. अजून दोघांच्या प्रवेशाची शक्यता आहे. या पाश्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.