भरधाव ट्रक घरात घुसला; एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ शहरातील गजानन महाराज मंदिराजवळ भरधाव ट्रक घरात शिरल्याने एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत.

भरधाव वेगाने धावणार्‍या एमएच ४६ एएफ ५५५४ क्रमांकाच्या मिनी ट्रकने आधी दोन जणांना कट मारले. यानंतर गजानन महाराज मंदिराच्या जवळ असणार्‍या घराला धडक दिली. दरम्यान या घरात दोन जण होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. या घराचे मोठे नुकसान झाले आहे. तर, रस्त्यावर कट मारल्याने देखील दोन जण जखमी झाले आहेत. सदर घटना अकरा वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान घटनास्थळी शहर पोलिसांच्या पथकाने धाव घेवून तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.