तरुणाची गळफास घेत आत्महत्या

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसाववल शहरातील रामेश्वर नगर, प्रोफेसर कॉलनी भागातील रहिवासी असलेल्या 27 वर्षीय तरुणाने मंगळवारी दुपारी दिड वाजता गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पवन रमेश चौधरी (वानखेडे,वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, रामेश्वर नगरातील रहिवासी असलेल्या पवन चौधरी या तरुणाने मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना कुटुंबियांना कळताच मोठा मानसिक धक्का बसला.

या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तुषार विनोद चौधरी (वय 26, रा. शनी मंदिर वॉर्ड, भुसावळ) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मयत पवन हा माजी नगराध्यक्ष विजय चौधरी व गोपाळ चौधरी यांचा भाचा होय. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.