भुसावळमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ शहरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध करुन त्या घटनेचे मोबाईलमधे कैद केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राज लोणारी रा. कडू प्लॉट भुसावळ या तरुणाविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहराच्या तापी नगर भागातील एका फोटो स्टुडीओमधे अल्पवयीन मुलीसोबत राज लोणारी या तरुणाने गेल्या दोन वर्षापासून वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर मुलीने त्याच्यासोबत मैत्री करण्यास नकार दिला असता घटनेचे मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची राज लोणारी याने तिला धमकी दिली. तसेच पीडितांचा पाठलाग करून घरात प्रवेश करत  तिच्यासोबत अंगलट करुन गैरवर्तन केले.

दरम्यान पीडितांच्या आई-वडिलांस जीवेठार मारण्याची धमकी दिली.  याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुन १५९/२०२२ कलम ३७६,३५४ (ड) ४४८,५०६ बाल लैगिंक अत्याचार कलम ४,८,१२ प्रमाणे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.