सोने खरेदीची संधी ! सोने-चांदीच्या दरात मोठा बदल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून सोने (Gold) आणि चांदीचे (Silver) दर घसरत आहेत. कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण (Gold Silver Price Today) झाली. भारतीय वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर (Silver Rate Today) 1 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. म्हणून सोने खरेदी करणाऱ्यांसाठी उत्तम संधी आहे.

आज गुरुवार 3 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव (Gold Rate Today) कमजोरीने उघडला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा दर गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात 0.57 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचवेळी आज चांदीचा दर 1.22 टक्क्यांनी घसरला आहे.

गुरुवारी वायदे बाजारात सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 286 रुपयांनी घसरून 50,320 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याचा दर आज 50,500 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​उघडला गेला.

जळगाव (Jalgaon) येथील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज जळगावातील सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,500 रुपयापर्यंत आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,900 रुपये आहे. तसेच आजचा चांदीचा दर  59,300 रुपयापर्यंत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.