Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भुसावळात दरोड्याच्या प्रयत्नात असणारी टोळी पिस्टल व घातक शस्त्रासह जेरबंद
    गुन्हे वार्ता

    भुसावळात दरोड्याच्या प्रयत्नात असणारी टोळी पिस्टल व घातक शस्त्रासह जेरबंद

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 19, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भुसावळ शहरात दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या टोळीस पिस्टल व घातक शस्त्रासह बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व भुसावळ पोलीस उपविभाग गावांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान शहरातील नॅशनल हायवेवर गोलाणी कॉम्प्लेक्स जवळील ब्रिज परिसरामध्ये काही आरोपी हे दरोडा घालण्याच्या पूर्वतयारी सह व घातक शस्त्रांसह सह एकत्रित जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

    त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश भोये, बाजार पेठ पोलीस स्टेशन, पोलीस नाईक यासीन पिंजारी, पोलीस नाईक रमण सुरळकर यांचे सह आरसीपी पथकातील स्टाफने मिळालेल्या गोपनीय माहितीची शहानिशा करणे कामी सदर ठिकाणी छापा टाकला असता एकूण पाच आरोपी संशयास्पद रित्या त्या ठिकाणी मिळून आले पोलीस आल्याची खबर लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने त्‍यातील पाचही आरोपी यांना पाठलाग करून आरोपींप्रमाणे आफाक पटेल (वय 26, रा. खडका रोड), सोमेश सोनवणे (वय 28, रा. राकानगर, भुसावळ), नाविद शेख शकील शेख ग्रीन पार्क भुसावळ, जितू पप्पू पिवाल, वाल्मिक नगर भुसावळ व अन्य एक वरील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये एक देशी कट्टा व चाकू सारखे घातक हत्यार मिळून आले.

    पोलिसांना संशय बळावला व त्यांची अजून सखोल विचारपूस केली असता सदरचे आरोपी हे राष्ट्रीय महामार्गावर दरोडा घालण्याच्या पूर्व तयारीनिशी त्या ठिकाणी एकत्रित आल्याचे निष्पन्न झालेले आहे व त्याची त्यांनी कबुली दिली आहे.

    आरोपींकडून देसी कट्टा, चाकू, 2 मोटरसायकल्स, काही संशयास्पद मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. बाजारपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी भादवि कलम 399, 402 कलम 03/25 शस्त्र अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे.

    सदरची कारवाई जिल्हा परिषदेचे डॉक्टर प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस नाईक यासिन पिंजारी, पोलीस नाईक रमण सुरळकर यांनी केलेली आहे.

    #bhusawal crime news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    भुसावळ घरफोडीचा 12 तासांत छडा!

    June 4, 2026

    रेतीच्या हव्यासापायी शहर पुराच्या दाढेत ढकलण्याचा प्रकार

    June 4, 2026

    तरूणीवर चौघांकडून सामूहिक बलात्कार

    June 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif