भुसावळात महामार्गावरील फौजी धाब्यात मद्यसाठा जप्त

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी सेकम शिवारातील नॅशनल हायवे क्रमांक सहालगत असलेल्या फौजी धाबा येथे दिनांक 18 रोजी धुलिवंदनाच्या दिवशी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाची मोठी कारवाई करीत देशी- विदेशी मद्याचा साठा जप्त केला.

उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या कार्यालयातील महिला पोलीस, निरीक्षक महिला पोलीस निरीक्षक चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, एएसआय शांताराम चौधरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदकिशोर सोनवणे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल शालीनी वलके, अश्विनी जोगी यांना भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी सेकम शिवारातील नॅशनल हायवे क्रमांक सहालगत असलेल्या फौजी धाबा येथे रवाना केले.

उपरोक्त पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता या हॉटेलमध्ये देशी- विदेशी मद्याच्या सुमारे 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्यावरून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 35/2022, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 खाली हॉटेलचे चालक संदीप ज्ञानेश्वर भोई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वानखेडे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हे करत आहे.

भुसावळ उपविभागाकडे शुक्रवार रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते. सदर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये भुसावळ बाजारपेठ, शहर, भुसावळ तालुका, नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विविध धडक कारवाया पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकीच ही एक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.